राहुरी :- आता माघार नाही… तुमच्या साथीने नगर सर करणारच. लवकर राजकीय भूमिका जाहीर करेन, असे युवानेते डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
गणेगाव, चिंचविहिरे, कणगर आणि वडनेर या गावांचा दौरा करून त्यांनी नागरिकांशी हितगुज साधले. त्यांच्या समवेत उदयसिंह पाटील, केशव कोळसे, मच्छिंद्र तांबे, विजय डौले, आर. आर. तनपुरे, कुलदीप पवार, जयसिंग घाडगे होते.
डॉ. विखे म्हणाले, निळवंडे धरणातून पाणी येण्याची वाट पाहण्यात एक पूर्ण पिढी गेली. आता मात्र हेडपासून काम सुरू व्हावे, यासाठी संघर्षाची भूमिका ठेवून जनआंदोलन उभे केले जाईल.
आजपर्यंत निळवंडे कालव्यांची कामे का सुरू झाली नाहीत, याचा आम्ही सखोल अभ्यास केला. राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी संस्थानकडून पाचशे कोटी उपलब्ध केले.
शासनानेही १०० कोटी देऊ केले. सुरुवातीच्या १३ किलोमीटर अंतराच्या कालव्यांसाठी या निधीचा वापर करावा, अशी आमची मागणी आहे. टेलकडून काम सुरू केले, तर आम्ही ते होऊ देणार नाही.