सुजय विखे ‘या’ पक्षाकडून लोकसभा लढविणार !

Published on -

अहमदनगर :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सुजय विखे पाटील यांचा आज किंवा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो. तसंच ते राष्ट्रवादीकडून ते अहमदनगर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये राज्यातील 48 जागांपैकी जवळपास सगळ्याच जागांवर सहमत झालं होतं. मात्र याला अहमदनगरच्या जागेचा अपवाद होता.

आता याच जागेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होत आहे. यानुसार काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार असल्याचे बोलले जाते.

अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु विखे पाटील आणि पवार कुटुंबातील वैर यामुळे या जागेवर निर्णय झालेला नव्हता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe