अहमदनगर :- महापालिकेचा माळीवाडा येथील कचरा रॅम्प स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर मनपाने ४५ दिवसांत हा रॅम्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप रॅम्पचे स्थलांतर झाले नसल्याने आंदोलन छेडण्यात येईल.
प्रसंगी महापौर व आयुक्तांच्या वाहनांवर कचरा टाकला जाईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी सोमवारी दिला. मनसेच्या वतीने १९ जुलैला माळीवाडा भागातील शाळेजवळ असलेला कचरा रॅम्प स्थलांतर करावा या मागणीसाठी आंदोलन केले होते.
रॅम्प स्थलांतरित केल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनाही व्यवस्थापनाने लेखी पत्र दिले होते. ४५ दिवसांत रॅम्प हटवला जाईल व ४ नवीन कॅम्पॅक्टर खरेदी करून हा कचरा शहरातील विभागनिहाय संकलन केला जाईल.
कचरा रॅम्पही बंद होईल, असेही सांगण्यात आले होते. परंतु ५० दिवस उलटूनही रॅम्प स्थलांतरित अथवा तेथून हटवलेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या यापूर्वी दिलेल्या आंदोलनाच्या इशाराऱ्यावर ठाम आहोत. कचऱ्याच्या गाड्या रॅम्पपर्यंत पोहोचू देणार नाही.
पाच दिवसांत हे आंदोलन चिघळणार असून कचरा गाड्या, कर्मचारी व अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे. प्रसंगी कचऱ्याची गाडी आयुक्त व महापौरांच्या गाडीवर डंपिंग होईल, असा इशारा भुतारे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
- सरकार राज्यात परवडणारी घरे बांधणार : एकनाथ शिंदे
- आता पुढील महाविजयासाठी लढा ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला
- तब्बल 10 वर्षानंतर मिळाला शेतकऱ्यांना दिलासा! कांदा साठवणुकीच्या शीतगृहांना मिळणार अनुदान
- विकासात संगमनेर तालुका राज्यात पहिल्या तीन मध्ये ! राजेश टोपे, डॉ रावसाहेब कसबे व वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रेरणा दिनानिमित्त गौरव
- टाटाच्या ‘या’ दोन्ही इलेक्ट्रिक कारवर मिळत आहे 85 हजारापर्यंत सवलत !