मुंबई – ‘पुन्हा नरेंद्र पुनः देवेंद्र मिशन 2019’ या फेसबुक पेजवरून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षावर व त्यांच्या नेत्यांविरोधात पोस्ट करण्यात येतात. मात्र आता चक्क भाजपसोबत युती करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर सुद्धा या पेजवरून टीका केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाली असली, तरीही या पक्षाच्या आयटी सेलची अजूनही युती झालीन नसल्याचे दिसून येत आहे.
कारण भाजपच्या आयटी सेलकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका केली जात असल्याच्या पोस्ट पाहायला मिळत आहे. तर विधानसभा निवडणुकीत आदित्य यांना मतदान न करण्याचे आवाहन सुद्धा भाजपच्या आयटी सेलकडून केले जात आहे.
रोज किड्यामुंग्यांसारखा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची स्थिती बदलेल अशा मेट्रो 3 प्रकल्पाला आदित्यांचा विरोध आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना त्यांची जागा दाखवाच असे आवाहन या पेजवरून करण्यात आले आहे.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.