अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना काही हजार मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अशा क्रमांक दोनच्या प्रतिस्पर्धी उमेदवारास प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी व प्रस्ताव पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने मांडण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकित काही मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला आहे. मात्र या प्रतिस्पर्धी उमेदवारांना देखील जनतेने चांगल्या प्रकारे कौल दिला असून, काही मतांचा फरक असल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे.

क्रमांक दोनच्या पराभूत उमेदवाराला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी केलेले मतदान वाया जाऊ नये व अदखलपात्र लोकसंख्या निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवी संघटनांच्या वतीने प्रतिआमदार ही संकल्पना मांडण्यात आली आहे. एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा सर्वसामान्य जनतेला भेटणे दुर्मिळ होतो व प्रश्न सोडविण्यास टाळाटाळ करीत असल्याचा जनतेला अनुभव आहे.
अशी कार्यपध्दत अमेरिकेत शॅडो सिनेट म्हणून असतित्वात असून, त्यांना कायदे मंडळात प्रत्यक्ष भाग घेता येत नाही व सरकारी वेतन देखील मिळत नाही.
क्रमांक दोनच्या उमेदवाराला प्रतिआमदाराचा दर्जा उपलब्ध करुन दिल्यास आमदाराच्या कार्यावर नियंत्रण, प्रशासनावर अंकुश, सरकारी अनागोंदी कारभारावर वचक व भ्रष्टाचार थांबविण्यास मदत होऊन सरकारी कामात पारदर्शकता निर्माण होणार आहे.
तर प्रतिस्पर्धी उमेदवार राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहून आपले कार्य करु शकता येणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
क्रमांक दोनच्या पराभूत प्रतिआमदारांचा लवकरच ज्येष्ठ समाजसेवकांच्या उपस्थितीत शपथविधी घेऊन त्यांना राजकीय जीवनात पुन्हा सक्रीय करण्याचा संघटनेचा मानस आहे. जगात कॉन्टम डेमोक्रसीचा प्रचार-प्रसार झपाट्याने चालू आहे. यामध्ये लक्ष ठेवण्याचे चांगले परिणाम दिसून आले असून, प्रतिआमदार आमदारांच्या कामावर लक्ष ठेवणार आहे.
ही प्रतिआमदाराची संकल्पना संपुर्ण महाराष्ट्र राज्यात राबविल्यास विकासात्मक बदल दिसून येणार आहे. जे प्रतिआमदार म्हणून राजकीय जीवनात सक्रीय होणार नाही. त्यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेतल्याचा संदेश पसरविण्यात येणार असल्याची भूमिका अॅड.कारभारी गवळी यांनी मांडली आहे.
क्रमांक दोनच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रतिआमदाराचा दर्जा मिळण्यासाठी माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अॅड.गवळी, अशोक सब्बन, यमनाजी म्हस्के, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव आदी प्रयत्नशील आहेत.
- वाईट काळ भूतकाळात जमा होईल ! 5 मार्चपासून ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, नशीब तुमच्या पाठीशी
- Home Loan घेण्यासाठी सध्याचा काळ फायद्याचा आहे का ? एक्सपर्ट म्हणतात, RBI……
- एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, मार्चअखेरीस ‘हा’ Metro मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार, तिकीट दर कसे असणार ? पहा….
- राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे बदलणार ? अहिल्यानगरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्सुकता