खासदार दिलीप गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागावे !

Published on -

अहमदनगर :- खासदार दिलीप गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. देशात फक्त नरेंद्र मोदीच सर्वांचे उमेदवार आहेत.

पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपची सत्ता येणार आहे, असा विश्वासही त्यांनी मंगळवारी व्यक्त केला. दानवे यांनी सकाळी खासदार गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली.

खासदार गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. दानवे व गांधी यांची सुमारे तासभर चर्चा झाली. निवडणुकीची जोरदार तयारी करा, अशी सूचना त्यांनी गांधी यांना केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News