पुणे : हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षात जायचेच होते. त्यांनी इंदापुरात कार्यकर्ता मेळावा घेऊन आमच्यावर टीका केल्यानंतर मी त्यांना सुमारे पन्नास ते पंचावन्न वेळा फोन केले. मात्र, त्यांनी फोन घेतले नाहीत.
त्यांच्या पुण्याच्या घरी भेटायलाही गेलो. मात्र, ते भेटले नाहीत. त्यांनी भाजपात जायचे ठरवलेच होते, तर बिल आमच्या नावावर फाडत आहेत? असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

सोमेश्वर साखर कारखान्याने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, लोकसभेच्या जागा वाटपावेळी पाटील यांच्या घरी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांशी आमची चर्चा झाली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांनी विधानसभेची जागा मागितली होती.
यांवर इंदापूरच्या जागेबाबत शरद पवार व राहुल गांधी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशी चर्चा झाली होती. त्यामुळे इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडू, असे आपण कधीच म्हणालो नव्हतो.
वास्तविक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांना थांबा म्हणत असताना ते भाजपात चालले आहेत. त्यामुळे त्यांनाच भाजपात जाण्याची घाई दिसत आहे. हर्षवर्धन पाटील व दत्तात्रेय भरणे या दोघांवर अन्याय न करता एकाला विधानसभा व एकाला विधान परिषद असा तोडगा काढता आला असता, असे पवार यांनी नमूद केले.
सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, सरकार सध्या फक्तभावनिक राजकारण करत आहे. राज्यात पूरस्थिती असताना त्यांना मदत करायची सोडून राज्यकर्ते यात्रा करण्यात दंग आहेत. आमच्याकडेही पंधरा वर्षे सत्ता होती. आम्ही कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही.
मात्र, अलीकडे सरकार पैशाचे आमिष दाखवून नेते फोडत आहेत. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून टीका करणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सरकारवर रोज टीका करायचे. मात्र, ईडीने त्यांची दिवसभर चौकशी केली, ते आता बोलत नाहीत.
- आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शन धारकांना मिळणार अधिक लाभ ? कस ते वाचा….
- जन्मजात नशीबवान असतात कोणत्याही महिन्याच्या ‘या’ 3 तारखांना जन्मलेले लोक ! Pm मोदी सुद्धा आहेत त्यातील एक
- ‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांवर पाडणार पैशांचा पाऊस ! मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले शेअर्स देणार जबराट परतावा
- Aadhar Card च्या ‘या’ नियमांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! आता….
- ‘या’ तारखांना जन्मलेले लोक अचानक होतात श्रीमंत ! १००% मिळवतात यश, झटपट यशस्वी होण्याचे सूत्र असते हाती













