नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार

Ahmednagarlive24
Published:

नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली.

‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने नगरमधील खोट्या अफवा बंद झाल्या आहेत,’ असेही त्यांनी कोणाचेही नाव न घेता आवर्जून स्पष्ट केले.

नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म घेवून नगरला राठोड आल्यावर केडगावकरांनी रंगोली चौकात त्यांचे स्वागत केले. या वेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, ‘नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार आहे.

नगर शहराचा विकास शिवसेनाच करणार, हा विश्वास जनतेला आहे. ज्यांनी पाच वर्षात नगरकरांना फक्त विकासाचा गप्पा आणि थापा दिल्या, त्याही बंद होतील.’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment