शनिशिंगणापूर :- रवींद्र बबनराव जरे (वय ४५) व त्यांची पत्नी ज्योती (४३) या दाम्पत्याचा पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना नेवासे तालुक्यातील लोहगाव शिवारातील गट क्रमांक ८४ मध्ये मंगळवारी मध्यरात्री घडली.
आपल्या घराजवळ जरे यांनी शेततळे तयार केले होते. शेतीला पाणी देण्यासाठी मध्यरात्री जात असताना पाय घसरून पाण्यात बुडून या दाम्पत्याचा मृत्यू झाला.

शेततळ्यात सुमारे २५ फूट पाणी होते. मंगळवारी सकाळी अन्य कुटुंबीय उठले असता त्यांना रवी व ज्योती घरात दिसले नाहीत.
शोध घेत असताना सकाळी ८.४५ च्या सुमारास त्यांचे मृतदेह शेततळ्यात आढळले. जरे कुटुंब हे झापवाडी येथील रहिवासी असून त्यांच्यामागे आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.