अहमदनगर :- परवानगी मिळूनही आठ दिवसांत चारा छावणी सुरू न केल्याने सहा संस्थांची छावणीची परवानगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केली. एका गावात दोन-तीन छावण्यांना मान्यता दिली आहे.
मान्यता मिळूनही छावण्या सुरू केल्या नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात १५१ चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसांत छावणी सुरू होणे बंधनकारक आहे.

सहा ठिकाणी विहित वेळेत छावण्या सुरू झाल्या नाहीत, म्हणून त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. छावणी कोठे सुरू झाली, याची माहिती पालकमंत्र्यांना असणे अपेक्षित आहे.
मात्र, कोणाचीही शिफारस आवश्यक नाही. त्यामुळे शिफारसपत्र असल्याशिवाय छावण्यांना मान्यता मिळत नाही, याचा त्यांनी इन्कार केला.