संगमनेर – येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी दबक्या आवाज चर्चा होती.
मात्र आज शुक्रवारी संगमनेर येथील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने इंदुरीकर महाराज थोरातांविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज रिंगणात उतरणार या दबक्या आवाजातील चर्चेला आजच्या इंदुरीकरांच्या उपस्थितीमुळे हवा मिळाली आहे.
इंदुरीकर महाराज हे निवडणूक रिंगणात उतरल्यास संगमनेरची विधानसभा निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. इंदुरीकर महाराज यांना युतीकडून उमेदवारीची ऑफर असल्याचेही समजते.
युतीच्या काही मोठ्या नेत्यांनी इंदुरीकरांची आतापर्यंत दोन तीनवेळेस भेट घेवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानेच इंदुरीकर आज मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर आल्याचे मानले जाते.
- राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर
- Jal Jeevan Mission :जलजीवन योजनेचे भवितव्य धोक्यात ! राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे
- ‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले
- Ahilyanagar Crime : युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Ahilyanagar Breaking : साडीने गळफास घेऊन १३ वर्षाच्या शाळकरी मुलीची आत्महत्या