लोणी येथे गुरुवार पासून राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद – डॉ. राजेंद्र विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:

प्रवरानगर :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय,पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वा. लोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या सिंधू हॉल मध्ये होत असलेल्या या ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चे उदघाट्न केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सहसचिव डॉ. नवलजीत कपूर यांच्या हस्ते करण्यात येणार असून,

या प्रसंगी राज्य आदिवासी विकास मंत्रालयाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा ,गडचिरोली सोसायटी फॉर एज्युकेशन रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) फाउंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग, बेंगलोर येथील व्ही,जी,के,के, अँड करूना ट्रस्टचे सचिव डॉ. एच सुदर्शन.

जबलपूर आय सी एम आर चे संचालक डॉ. अप्रूप दास,दिल्ली येथील जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. चंद्रकांत लहारीया,आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय एम जयराज हे उपस्थित राहणार आहेत.

प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर यांच्या संकल्पनेतून या आदिवासी आरोग्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये देशातील आदिवासी समाजासाठी काम करणारे सुमारे ३० तज्ञ् मार्गदर्शन करणार आहेत.

या परिषदेकरिता महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, उडीसा,राज्यस्थान,पंजाब, तामिळनाडू,उत्तराखंड,पश्चिम बंगाल,तसेच पॉण्डेचारी आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासह इकून २० राज्यांचे सुमारे तिनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सेंटर फॉर सोशल मेडिसिन चे प्रा. सोमसुंदरम खंडुरी,परिषदेचे समनव्यक डॉ. सुनील थिटमे,विद्यापीठाचे डॉ. संपतराव वाळुंज , डॉ राहुल कुंकूलोळ आदी या वेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment