कर्जत :- शिंदे साहेब तुम्ही रासपची वेळोवेळी अवहेलना केली. मात्र आता कर्जत – जामखेडचा आमदार हा महादेव जानकर ठरवतील तोच होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा शेळी – मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयामध्ये उत्साहात पार पडला, यावेळी दोडतले बोलत होते.

या मेळाव्यासाठी अण्णा रुपनवर, नितीन धायगुडे, माणिक दांडगे, भानुदास हाके, दादासाहेब केसकर, दादासाहेब वाघमोडे रमेश व्हरकटे, संतोष गलांडे मंदाकिनी वडेकर, सुवर्णा जराड, मनीषा जगताप, विकास मासाळ, संदीप केदारी, प्रशांत शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रमेश व्हरकटे यांनी केले.
दोडतले म्हणाले, मंत्री राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील रासप कार्यकर्त्यांची व मतदाराची कायमच अवहेलना केली आहे. मला महामंडळ मिळू नये यासाठी देखील शिंदे यांनी प्रयत्न केले होते. शिंदे साहेब तुम्हाला आमचा एवढा तिटकारा का? असे म्हणत त्यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख