नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता ?

Published on -

सातारा :- देशात रोजगार नाहीत त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. याकडे डोळेझाक करून भाजप सरकार काश्मीरमधील ३७० कलमासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत आहे.

हे त्यांनी थांबवावे आणि नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता हे जाहीर करावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात आज आर्थिक मंदी आहे, रोजगार उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हे जनतेला दिवास्वप्न दाखवत सुट आहेत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe