बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत.
छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली.

मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला, असा घणाघात धनंजय मुंडेंनी केला.
विनायक मेटे महजनादेश यात्रेच्या बसवर चढले आणि खेळ झाला. मंत्री रुसून गेल्या, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली.
जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले. इथे रोजगार नव्हता म्हणून ते गेले. आष्टीचं बेणं भाजपात गेलं, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
“शरद पवार साहेबांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासह अन्य मागासवर्गीय नेत्यांना खुल्या जागेतून आमदार- खासदार केलं. भाजपचं आता विभाजन झाले आहे.
ज्या बबनराव पाचपुते यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले, त्यांनाच भाजपात घेऊन पवित्र केलं. मुख्यमंत्री आधी बबन्या म्हणायचे, आता बबनराव पाचपुते असं नाव घेतात”, अशी टोलेबाजी धनंजय मुंडे यांनी केली.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख