अहमदनगर :- राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची व निवडणूक शाखेची जाेमात तयारी सुरू आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक शाखेच्या वतीने प्रशिक्षण वर्ग, बारा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती व विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शासकीय बैठका होत असून मतदारांच्या सेवेसाठी चोवीस तास हेल्पलाईन सेवा सुरू होत आहे.

लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या सी व्हिजिल या App चाही या निवडणुकीत वापर केला जाणार आहे. याद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करता येणार आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाईल. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लवकरच सी व्हिजिल कक्ष सुरू होत आहे.
मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप होत असल्यास, शस्त्रसाठा अथवा शस्त्राचा वापर होत असल्यास, मतदारांना मारहाण तसेच दमबाजी होत असल्यास, चिथावणीखोर भाषण केले जात असल्यास, पेड न्यूज व फेक न्यूज लक्षात आल्यास,
मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर होत असल्यास, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक होत असल्यास, उमेदवाराची मालमत्तेबाबत व विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाइल App वर तक्रार करता येते.
- अहिल्यानगरमधील एमआयडीसीमधील कामगार हॉस्पिटलचा प्रश्न राज्य शासनाने मार्गी लावावा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
- अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे ॲक्शन मोडवर
- कर्जतमध्ये सोन्याची बिस्कीट बनवून देतो म्हणत वृद्ध महिलेल्या गंडवणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड
- अहिल्यानगर शहरात मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे तगडे नियोजन, तब्बल १००० हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त
- अहिल्यानगर मार्केट यार्डमध्ये एकाच रात्री ८ दुकाने फोडणाऱ्या सराईत चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या