जामखेड :- जिल्ह्याच्या व कर्जत-जामखेड तालुक्यातील सुपुत्राची आपल्या विकास करण्यासाठी गरज आहे, बाहेरच्या उसण्याची उधारीची गरज नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी रोहित पवार यांच्याावर नाव न घेता केली.जामखेड येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी उपजिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, संचालक सुधीर राळेभात, सभापती सुभाष आव्हाड, पंचायत समिती सदस्य माजी सभापती भगवान मुरूमकर, ज्येष्ठ नेते किसनराव ढवळे, सभापती गौतम उतेकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशीद,

पाणी पुरवठा सभापती अमित चिंतामणी, पणन संचालक डाॅ. ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच संजय गोपाळघरे, साकतचे सरपंच हरिभाऊ मुरुमकर, माजी सरपंच भारत काकडे, नायगावचे माजी सरपंच भारत उगले, सातेफळचे सरपंच गणेश लटके, बांधखडकचे सरपंच केशव वनवे, खांडवीचे सरपंच डॉ. गणेश जगताप आदी बोलत होते.
खा. डॉ. विखे म्हणाले, ज्या पवार कुटुंबीयांनी आम्हाला गेल्या ३० वर्षे त्रास दिला आहे, अशा पवार यांना आता आम्ही त्यांच्या उमेदवारीचे डिपाॅिझट जप्त करण्याची जबाबदारी घेतली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी विशेष प्रयत्न करुन कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी विधानसभेत कायमस्वरूपी मंजूर घेऊन त्यासाठी ४०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
कर्जत-जामखेड विधानसभेची निवडणूक विखे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. विखे कुटुंब हे गोरगरीब व शेतकऱ्यांच्या हितासाठी व समाजसेवा करत आहे. आम्ही कधीही फोटो काढून ते फेसबुकवर टाकले नाहीत.
- Mhada चा मुंबईमधील ‘या’ घरांसाठी मोठा निर्णय ! हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार, वाचा…
- NMDC Steel Limited Jobs 2025: स्टील कंपनीत कंत्राटी कर्मचारी पदाची मोठी भरती सुरू! 1,80,000 पर्यंत पगार मिळणार
- सातवा वेतन आयोग अंतिम टप्प्यात सरकारी कर्मचाऱ्यांना देणार दणका ! ‘या’ कारणामुळे पगाराचा आकडा कमी होण्याची शक्यता
- पुढील 4-5 वर्षात मुंबई मोठ्या प्रमाणात बदलणार ! राजधानी मुंबईसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला ‘हा’ खास प्लॅन
- Pune News : पीएमपीमध्ये होणार मोठे बदल ! अजित पवारांनी सांगितला मोठा प्लॅन….