पिचडांना शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक, सेनेसह भाजप नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

Ahmednagarlive24
Published:

अकोले :- राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड-पुत्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, जि. प सदस्या सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर आता पिचडांना शह देण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याची तयारी अकोलेतील विविध नेत्यांनी केली. यापूर्वी मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांचेविरोधात अशोक भांगरे नेहमीच लढत होते. मात्र मतविभाजनामुळे पिचडांना नेहमीच फायदा झाला.

आता अकोलेतून डॉ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, अशोक भांगरे हे तिघेही इच्छुक आहेत. मात्र आता राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते याकडे अकोलेकरांचं लक्ष लागलं  आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment