पुणे : आघाडीत पुण्यातील आठपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तर तीन जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात येणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.
मित्रपक्षासाठी सोडलेली जागा कोथरूडची असून तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्चस्व आहे. यामुळे ही जागा मनसेसाठी सोडली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला सामावून घेतले जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आता जोमाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी निवडणुकीची तयारी नेमकी कशी करावी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराला काय सांगावे, याबाबत पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी जागावाटपाची घोषणा केली. ते म्हणाले, आघाडीमध्ये पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. त्यामध्ये पर्वती, वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला या जागांचा समावेश आहे.
तसेच इतर ३ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात येणार आहे. मित्रपक्षासाठी सोडलेली जागा कोथरूडची आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामावून घेण्यासाठीच ही जागा सोडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
- सावधान…! चहा पिताना ही घ्या काळजी
- Mutual Fund Lumpsum Investment | म्युच्युअल फंड मध्ये एकरकमी 5 लाखाची गुंतवणूक केली तर 15 वर्षांनी किती रिटर्न मिळणार ?
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….