जामखेड: जामखेड तालूक्यातील अर्धी राष्ट्रवादी भाजपात येण्याच्या मार्गावर असुन येत्या 15 दिवसात तालुक्यातील अनेक बडे नेते भाजपात आणणार असल्याचे पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरुमकर यांनी स्पष्ट केले. तसेच मी भाजपातच असुन ना राम शिंदे यांचेच काम करणार आहे, मुरुमकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपातुन राष्ट्रवादीमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान अनेक भाजपातील नेत्याबद्दल अफवा पसरल्या होत्या यामध्ये विद्यामान पंचायत समिती सदस्य भगवान मुरुमकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याचे अफवा पसरली होती. आज भगवान मुरुमकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण भाजपमध्येचं असल्याचे स्पष्ट केले.
मुरुमकर म्हणाले, मी भाजपातच असुन आगामी काळातही मंत्री राम शिंदे यांचेच काम करणार आहे. विरोधकांच्य्या पायाखालची वाळू सरकली असल्याने भाजपच्या नेत्याबद्दल अफवा पसरल्या जात आहे. मंत्री राम शिंदे यांनी कर्जत जामखेड तालुक्यात भरघोस विकास कामे सुरू आहेत. एकही भाजपाचा नेता व कार्यकर्ता राष्ट्रवादीत जाणार नाही, असे मुरुमकर यांनी स्पष्ट केले
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, सारोळाचे संरपच अजय काशीद, शिऊरचे संरपच हनुमंत उतेकर, मनोज कुलकर्णी, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, रत्नापूरचे संरपच दादासाहेब वारे, सोमनाथ राळेभात, काशीनाथ ओमासे, विलास मोरे, पांडुरंग उबाळे, प्रवीण चोरडिया, शरद कार्ले, नगरसेवक महेश निमोणकर, संतोष गव्हाळे उपस्थित होते.
- Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमध्ये ठाकरे सेनेला मोठा हादरा ! 12 माजी नगरसेवक शिंदे गटात
- iQOO Neo 10R 5G येतोय! 6400mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले असलेला धाकड स्मार्टफोन
- Creta इलेक्ट्रिक लॉन्च! एकदा चार्ज करुन तब्बल 473 किमी प्रवास करा
- Tata Curvv EV अन Mahindra BE 6 दोन्ही Suv चे फिचर्स, प्राईस अन स्पेसिफिकेशन एकाच क्लिकवर ! दोघात कोणती गाडी पॉवरफुल ? पहा…
- Jio ने महागडे प्लॅन केले बंद! नवे स्वस्त कॉलिंग प्लॅन लॉन्च!