किरकोळ कारणावरुन मारहाण,परस्परविरोधी गुन्हे दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे किरकोळ कारणावरुन मारहाण झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. 

सत्तार पिरमोहमंद शेख (वय ५२, रा.नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सलमान हुसेन पठाण, मासूम हुसेन पठाण, शोएब चॉंद शेख, सोहेल चॉंद शेख, साहिम चॉंद शेख, कलिम शकरुद्दीन शेख, रियाज मुनीर पठाण (सर्व रा.नागरदेवळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी शेख या मारुती मंदिराजवळ थांबल्या होत्या. तेथील शाळेजवळ सलमान व मासूम हे झाडे तोडत असताना फिर्यादीचा मुलगा अनिस सत्तार शेख तेथे आला.

 तो तुमच्याकडे पाहून थुंकला नाही, असे बोलल्याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारास लाथाबुक्याने मारहाण केली. 

फिर्यादीचा मुलगा अनिस, साजीद व माजिद यांनाही दगड मारुन जखमी केले. पुढील तपास पोहेवा. घायतडक करत आहेत.दरम्यान परवेश अकबर पठाण यांनीही भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment