अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार डाॅ. किरण लहामटे सध्या सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानत ते सत्कार स्वीकारत आहेत.
बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीला ते वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

डाॅ. लहामटे दुपारनंतर मुंबईला रवाना झाले. ते सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले, पण तोपर्यंत नेता निवड झाली होती.
स्वतः अजित पवार यांनी आपल्या भाषणात लहामटेंचा नामोल्लेख केल्यामुळे माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांची ४० वर्षांची एकहाती सत्ता उलथवून
विक्रमी मतांनी विजयी झालेले हे डाॅ. लहामटे कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या आमदारांना व कार्यकर्त्यांना होती.
मात्र, ही संधी डाॅ. लहामटे यांनी गमावली. नंतर डाॅ. लहामटे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यास डॉ. लहामटे यांना वेळ मिळालेला नाही.
शेतकरी पुरते हवालदिल झाले असताना नवे आमदार त्यांच्या मदतीला कधी धावून येणार आहेत, अशी विचारणा केली जात आहे.
- भारताच्या हाती सुपर डिफेन्स सिस्टम, S-500 मुळे चीन-पाकिस्तान दोघांनाही झटका!
- फ्रीजमध्ये दोन-दोन दिवस अन्नपदार्थ ठेवताय? मग एकदा नक्की वाचा हा हादरून टाकणारा रिपोर्ट!
- क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार लगावणारे टॉप-5 खेळाडू, नंबर 1 वर ‘या’ भारतीय कर्णधाराने मारली बाजी!
- ‘या’ टॉप-10 परवडणाऱ्या देशांमध्ये कमी बजेटमध्येही जगता येईल आलिशान आयुष्य; पाहा यादी!
- …म्हणून भगवान जगन्नाथांना अर्पण करतात कडुलिंबाचा नैवेद्य; वाचा यामागील रंजक आणि भावनिक कथा!