सेनेत सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो : राठोड

Published on -

अहमदनगर :- शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून विविध पदांवर नियुक्ती करून त्यांना न्याय देण्यात येत आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पावती या पदाच्या माध्यमातून मिळत आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे.

कारण शिवसेनाच सर्वसामान्यांना जवळची वाटत असल्याने शिवसैनिकांनी त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. विजय सानप यांनी उपनगरात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे चांगले प्रयत्न केले आहेत,

असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. शिवसेनेच्या उपशहरप्रमुखपदी विजय सानप यांची नियुक्ती करून उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe