अहमदनगर : शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा.असे साकडे या शिष्टमंडळाने ठाकरे यांना घातले.राठोड यांच्याबाबत आपण विचाराधीन असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अशी माहिती सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.
शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली.शिवसेनेला राज्यात मिळालेल्या यशाबद्दल ठाकरे यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी अनिल राठोड यांच्याबाबत पक्षाने विचार करावा.असे साकडे उद्धव ठाकरे यांना घालण्यात आले.या शिष्टमंडळाच्या मागणीस ठाकरे यांनी होकार दिला आहे.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक अमोल येवले,बाळासाहेब बोराटे,राजेंद्र राठोड,परेश लोखंडे,दत्ता जाधव, योगीराज गाडे,निलेश भाकरे,रवी वाकळे,सुनील लालबोंद्रे,रवि लालबोंद्रे,संजय छजलानी,महिला आघाडीप्रमुख आशा निंबाळकर,अरुणा गोयल आदी उपस्थित होते.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उपनेते अनिल राठोड व राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्यात अटीतटीच्या निवडणुकीत राठोड यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
जिल्ह्यात राठोड यांच्यासह शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.जिल्ह्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने ठाकरे यांची भेट घेऊन राठोड यांच्याबाबत विचार करण्याची मागणी केली आहे.
- Bank Loan: सणासुदीत तुम्हालाही घर किंवा कार घ्यायची आहे? ‘ही’ बँक देत आहे स्वस्तात कर्ज… बघा माहिती
- Upcoming IPO: पुढील आठवड्यात IPO करणार धमाल! बघा बाजारात एन्ट्री करणाऱ्या आयपीओंची यादी… लाखो कमवण्याची संधी
- सापांची भीती वाटते ? मग घरात ही वस्तू अवश्य ठेवा, साप दिसला की शिंपडा, 100% साप पळून जाणार
- लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! तुम्हालाही योजनेतून काढून टाकलंय का ? कशी पाहणार यादी ?
- पावसाळा संपल्याबरोबर 10 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! पहिल्या दिवसापासून कमाई सुरु