घरगुती वादातून भररस्त्यात पत्नीवर धारदार शस्त्रांचे घाव

Published on -

नागपूर ;- घरगुती वादातून पतीने पत्नीला रस्त्यावर गाठत तिच्यावर धारदार शस्त्रांचे घाव घालत तिला गंभीररीत्या जखमी केल्याची थरारक घटना सोमवारी दुपारी नागपुरातील कॅनल रोड या रहदारीच्या मार्गावर घडली.

या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींमध्ये घबराट पसरून पळापळ झाली. मोनाली सचिन तोटे असे या जखमी महिलेचे नाव असून तिला धंतोली परिसरातील केअर रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले आहे. तिची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मोनाली तोटे या नेहमीप्रमाणे स्कुटी घेऊन कामावर निघाल्या होत्या. त्याच वेळी त्यांचा पती सचिन याने त्यांचा स्वत:च्या वाहनाने पाठलाग सुरू केला.

सीताबर्डी परिसरात कॅनल रोडवर सचिनने त्यांच्या वाहनापुढे आपले वाहन आणून त्यांना खाली पाडले. यानंतर दोघांमध्ये मिनिटभर वादही झाले. या वादात सचिनने स्वत:जवळील धारदार शस्त्र काढून मोनाली यांच्यावर वार केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe