डोंबिवली : एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरुणाने १९ वर्षीय तरुणीची गळा घोटून हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी पोलिसानी या तरुणाला अटक केली आहे.
दीपक भणगे असे या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली पूर्व येथील सुनील नगर परिसरातील जय मल्हार सोसायटीत राहतो. तर हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव ऐश्वर्या देशपांडे ( १९ ) असे असून ती आपल्या कुटुंबासह याच सोसायटीत राहत होती.
ऐश्वर्या ही महाविद्यालयात शिकत होती. तर दीपक हा कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याची ऐश्वर्यावर वाईट नजर होती. मात्र ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती.
परंतु दीपक तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता, मात्र ती त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे दीपक निराश झाला होता. या नैराश्यातून तरुणाने तिचा गळा दाबून हत्या केली.