अहमदनगर :- केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून श्रध्दांजली वाहिली.
कॅण्डलमार्चमुळे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह ८० जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
केडगावातील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची ७ एप्रिल २०१८ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून दोन्ही शिवसैनिकांना श्रध्दांजली वाहिली.
राठोड यांच्यासह शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, योगिराज गाडे आदी मार्चमध्ये सहभागी झाले होते.
केडगाव गावठाण, अंबिका बसस्टॉप, शाहूनगर मार्गे सुवर्णानगर असा कॅण्डलमार्च काढण्यात आला. मात्र, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाला.
कोतवाली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल नवनाथ गोरे यांच्या फिर्यादीवरून राठोड, गाडे, सातपुते यांच्यासह ८० जणांच्या विरूध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- तुम्हाला बजरंगबली हनुमानाच्या गदेचे नाव माहिती आहे का ? पवनपुत्राला कोणी दिली होती गदा ? वाचा…..
- लाडक्या बहिणींनो 1500 सोडा ‘या’ योजनेतून दरमहा मिळणार सात हजार रुपये ! 10 वी पास महिला अर्ज करू शकतात
- OnePlus लवकरच लॉन्च करणार सर्वाधिक स्लीम फोल्डेबल स्मार्टफोन ! कसा असणार वनपल्सचा Open 2 स्मार्टफोन ?
- तुमचे Pan Card सुरु आहे का ? खराब झालेय ? असे बनवा नवे कार्ड
- iPhone 16 : आयफोन खरेदीसाठी सुवर्णसंधी ! ह्या पेक्षा स्वस्त कधीच मिळणार नाही…