पंढरपूर – भगर खाल्ल्याने 50 ते 60 वारकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते आहे.हे सर्व भाविक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील असून त्यांच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कार्तिकी यात्रेच्या एकादशीसाठी पंढरपूरला आले असल्याने उपवास असणाऱ्यांनी ही भगर खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याची माहिती मिळते आहे.
ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यातील ५० ते ६० भाविकांना उलट्या जुलाब सुरु झाले. सध्या त्यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.