गडचिरोली जिल्ह्यात तरुणाची गळा चिरून हत्या

Ahmednagarlive24
Published:
नागपूर :- पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 
 
काशीराम असे मृताचे नाव आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुका सुरळीत पार पडल्यानंतरची ही पहिलीच घटना आहे.
रविवारी रात्री नक्षलवादी धानोरा तालुक्यातील रानकट्टा या गावात आले. त्यांनी काशीरामला घरातून बाहेर काढून गावाबाहेर नेले व तेथे गळा चिरून त्याची हत्या केली.
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय २०१६ च्या नोटबंदीच्या काळातील घडामोडीही या घटनेत कारणीभूत असल्याचे पोलिसांना वाटते.
नोटबंदीच्या काळात नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणातील नोटांची अदलाबदल करण्यासाठी अनेक गावकऱ्यांकडे सुपूर्द केल्या होत्या. मात्र, अनेक गावकऱ्यांना ते शक्य न झाल्याने वा अन्य कारणाने जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी यापूर्वी अनेकांची हत्या केली आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment