अहमदनगर :- नगर तालुक्यात छावण्यां अभावी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. सहा वर्षापूर्वी ते स्वत:च अशी मागणी करत होते, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धनशाम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किसन लोटके, बाळासाहेब पवार, अशोक झरेकर, शरद बडे उपस्थित होते. शेलार म्हणाले, वसंत झरेकर (घोसपुरी), लक्ष्मण गाडे (खांडके) आणि रविवारी अतूल पवार (मेहकरी) या शेतकऱ्यांनी छावण्यांअभावी आत्महत्या केली.

नगर तालुक्यात ६६ छावण्या आणि ७० गावांत टँकरच्या १५० खेपा टाकल्या जात होत्या.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दमदाटी करून सर्व छावण्या बंद आणि टँकरच्या ६६ खेपा कमी केल्या. आज नगर तालुक्यात समाधानकारक पाऊस नाही.
जनावरे आणि माणसांना पाणी हवे आहे. टँकरच्या खेपा वाढायला हव्या होत्या, तर त्या कमी केल्या. दुष्काळाबाबत सरकार आणि प्रशासन असंवेदनशील आहेत. घोसपुरी आणि खांडके येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर कोणताही सक्षम प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कुटुंबिायांना भेटावयास गेलेला नाही.
घोसपुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत मिळवून देऊ, अधिकाऱ्यांव कारवाई करू, असे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले होते.
पण अद्याप काहीही झालेले नाही. हे मंत्री विखे आणि औटी यांचे अपयश आहे. किंवा सरकार मध्ये त्यांचे कोणी ऐकत नसेल तर त्यांनी आत्मचिंतन करावे, असा उपरोधिक टोलाही शेलार यांनी लगावला.
- 5-स्टार सेफ्टी, जबरदस्त फिचर्स ! फक्त 8.29 लाख रुपयाची ‘ही’ SUV क्रेटा आणि विटाराला टक्कर देणार
- ‘हे’ 5 स्टॉक्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! टॉप ब्रोकरेजने दिली Buy रेटिंग
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?