सध्या लोकांमध्ये हर्बल टीची क्रेझ वाढताना दिसत आहे.बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सचे हर्बल टी उपलब्ध असतात. या सर्व हर्बल टीमध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक टी लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. परंतु चहा इतरही अनेक रंगांमध्ये असते.
जशी व्हाइट आणि येलो टी. हे चहा वेगवेगळ्या फुलांच्या अर्कापासून तयार करण्यात येतात. यामध्ये एक निळा चहा असतो त्याला ‘ब्ल्यू टी’ म्हणून ओळखलं जातं. ग्रीन टीपेक्षाही हा चहा शरीरासाठी फायदेशीर असतो.
आज आम्ही तुम्हाला या स्पेशल चहाविषयी माहिती देणार आहोत. ब्लू टी गोकर्णाच्या फुलांपासून बनवला जात असल्यामुळे त्याचा रंग निळा असतो. गोकर्णीचे फूल जितके सुंदर दिसतं तितकंच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतं.


1) रोगप्रतिकारक शक्ती ब्लू ती मध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं.
2) डायबिटीज
तुम्हाला डायबिटीज असेल तर या चहाचा एक कप तुमचं डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. डायबिटीजपासून संरक्षण करते,शरीरात ब्लड शुगर आणि ग्लूकोज मॅनेज करण्यात ब्लू टी खूप काम करते.
3) इंफेक्शनशरीरात कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन झाल्यास ही चहा ते इंफेक्शन नष्ट करते. दररोज कमीत कमी दोन कप ब्लू टी प्यायला पाहिजे.
4) स्किन
ब्लू टीमध्ये अॅन्टिऑक्सिडेंट खूप असतात, ज्यामुळे आपली स्किन आणि केसांसाठी खूप फायदेशीर होतं. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, या टीमध्ये व्हिटामिन आणि मिनरल देखील असतात.
5) कॅन्सर या चहामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट खूप असतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो आणि कोणाला कॅन्सर असेल तर पेशी वाढण्यास प्रतिबंधित करते. अॅन्टिऑक्सिडेंट आणि यातले गरजेचे मिनिरल्समुळे सेल्सला नुकसान होत नाही.ब्लू टीचं फूल गोकर्णामध्ये अँटी ऑक्सीडेंट असल्याने कँसर सारख्या आजारांना तो दूर ठेवतो.

6) डोळ्यांसाठी
डोळ्यांना होणारा कोणत्याही प्रकारच्या त्रासावर ब्लू टी खूप काम करतं. यात उपस्थित अॅन्टिऑक्सिडेंट डोळ्यातील पेशीत ब्लड सर्कुलेशन वाढवते. यामुळे डोळे चांगले राहतात.
7) लिव्हर, किडनी, आणि पोटासाठी…
ब्लू टी जर तुम्ही रोज प्यायल्यास यामुळे लिव्हर, किडनी, पोट आणि आतड्यांची सफाई होते. ही चहा तुमचं शरीर डिटॉक्स करते. ही अन्टिऑक्सिडेंट, अॅन्टी-इंफ्लेमेटरी आणि नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवते.
8) वजन कमी करण्यासाठी
ब्लू टीमध्ये मेटाबॉलिज्मशी संबंधित त्रास दूर करतं. मेटाबॉलिक रेट वाढवण्यात उपयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह होतं. एवढंच नाही तर हे लिव्हरची सूज देखील कमी करते.
9) मायग्रेन
मायग्रेनच्या रूग्णांनी रोज सकाळी ही चहा प्यायल्यास त्यांना मायग्रेनचा झटका येणं कमी होतं. ब्लू टी स्ट्रेस, अॅसिडीटी कमी करून ब्लड सर्कुलेशन वाढवते. ज्यामुळे मेंदूत रक्ताचा प्रवाह चांगला राहतो आणि मायग्रेन अॅटक येत नाही.
10) हृद्यासाठी
हृद्याचं आरोग्य ब्लू टी जर तुम्ही जेवणाच्या आधी किंवा नंतर घेतला तर तुमच्या शरीरातील ग्लूकोज आणि ब्लड शुगरचं प्रमाण संतुलित राहतं. शरीराचं इंफेक्शनपासून बचाव करतात. हृद्यासाठी ब्लू टी आरोग्यदायी ठरतो.

11) तणाव आणि चिंता
ब्लू टीच्या सेवनाने तुमच्या बुद्धीलाही चालना मिळते. यामुळे माइंड फ्रेश राहतो, ब्लू टी प्यायल्याने तणाव आणि चिंता दूर होतात.
12) थकवा पळवतो दूर – ब्लू टीच्या सेवनामुळे तुमच्या चिंता आणि तणाव दूर होऊन तुम्हाला रिफ्रेश वाटतं.
13) डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी
डोळ्यांचा थकवा, सूज आणि रॅटीना पॉवर वाढविण्यासाठी निळा चहा फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करण्यासाठी हा चहा लाभदायक ठरतो.
14) केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून
जर तुम्हाला केस गळण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आजपासूनच या चहाचे सेवन करणं सुरू करा. त्यामुळे केसांच्या इतरही समस्या दूर होण्यास मदत होते.
असा’ बनवा ब्लू टी…
सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये गोकर्णाचे फूल हलकसे चुरडून घाला आणि त्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर मिक्स करा. चहा गाळतेवेळी फूल बाजूला काढा. तुमचा ब्लू टी तयार.
- भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये
- 6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद
- जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या