अहमदनगर :- काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. यंदाच्या विधानसभेत कर्जत जामखेड हा मतदार संघ राज्यात चांगलाच चर्चेत आला.
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गत सहा महिन्यांपासून चांगलाच जम बसविला होता रोहित पवार यांनी हि पूर्ण निवडणूक पूर्णता विकासाच्या प्रश्नावर लढवली.


धनगर आरक्षण, मतदार संघाकडे झालेलं दुर्लक्ष, तालुक्यातील मुलभूत प्रश्न आणि जनतेशी नसलेला संवाद ह्या कारणामुळे अखेर मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव झाला.
निवडणूक प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस,उदयनराजे भोसले,पंकजा मुंडे, या भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या सभा ह्या मतदार संघात राम शिन्देसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
ह्या सभामधून रोहित पवारांवर बारामतीच पार्सल अशी टीका होत होती, या उलट रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका न करता मतदारसंघातील प्रश्नांबाबत भूमिका मांडत मतदारांना आपलेस केल.
अखेर कर्जत जामखेड मध्ये मतदारांनी काम न करणार पार्सल अखेर घरी पाठवले असून विकास प्रश्नावर बोलणार्या रोहित पवार यांना आमदार बनविल आहे !
- देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लॅन ? महाराष्ट्रात 36 नाही 80 जिल्हे ! राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती
- आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि 68 लाख पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी !
- Explained : पाथर्डीत पुन्हा रंगणार राजळे Vs ढाकणे युद्ध ! काय होणार निवडणुकीत ?
- RBI चा मोठा दणका ! देशातील ‘या’ मोठ्या बँकेचे लायसन्स रद्द, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोगापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला ? वाचा सविस्तर