खामगांव – फुलंब्री तालुक्यातील जळगांव मेटे मित्राने कब्बडी खेळाण्यासाठी नकार मिळाल्यामुळे एकाने रागात येऊन ब्लेडने वार केल्याची घटना सोमवार (दि.११) रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
जळगाव मेटे येथील रामेश्वर काळुबा मेटे(२३) दि. ११ रोजी रात्री ८ः३० सुमारास ग्रामपंचायत कार्यलयाजवळ मित्रासोबत होता. तेथे आरोपी नवनाथ प्रकाश मेटे हा आला व त्यांने रामेश्वर काळुबा मेटे यास कब्बडी खेळण्यासाठी चल असे म्हणून आग्रह करू लागला.
परंतु रामेश्वर मेटे याने त्यास नकार दिला. याचा राग आल्याने नवनाथने त्याच्या जवळील ब्लेडने त्याच्या उजव्या व डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच चापट बुक्यांनीही मारहाण केली.
या प्रकरणी रामेश्वर मेटे यांच्या फिर्यादीवरून वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नवनाथ यास अटक करून फुलंब्री न्यायालया समोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. सपोनी संतोष बी.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ मुज्जीब सय्यद हे करीत आहे.