कोपरगाव :- राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय व युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव अनेकांसाठी अनपेक्षित होता. कोल्हेंशिवाय अन्य उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच धारणा राजकीय वर्तुळात झाली होती, परंतु जनमानसात कोल्हेंबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेत आशुतोष यांनी विजयश्री खेचून आणली.
त्यांच्या विजयामागे अनेक शिलेदार आहेत. छुपे मतदानही काळेंच्या पारड्यात पडले. मागच्या पराभवाचा वचपा काढत कमी फरकाने का होईना, परंतु ते निवडून आले. निवडणूक काळात काळे समर्थक विजय आढाव गट कोल्हेंना जाऊन मिळाला, नितीन औताडेंनीही समर्थन दिले.

शिवाय सेनेतील राजेंद्र झावरे गटाचीही मदत झाल्याने कोल्हे यांचे पारडे जड झाले. काळे यांनी वेगळी रणनिती अवलंबली. मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवले. कोल्हेंवर नाराज असणाऱ्यांनी काळेंना मदत केली. राजेश परजणे व विजय वहाडणेंचा विखारी प्रचार कोल्हेंविरुद्ध चालूच होता, तो काळेंच्या पथ्यावर पडला.
कोल्हे व समर्थकांना फाजील आत्मविश्वास नडला. कोल्हेंनी वहाडणेंना नाहक महत्त्व देऊन टीका केली. काळे व परजणे स्पर्धकच नाहीत, या थाटात त्यांनी प्रचार केला. कोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले.
- 3 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तरीही ‘या’ लोकांना आयटीआर द्यावाच लागतो ! पहा ITR चे नवे नियम
- साईबाबांच्या नाण्यांवरून मुक्ताफळे उधळणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा- पालकमंत्री
- कोपरगाव नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर, आधी कामे झाली मग काढल्या निविदा
- शेतकऱ्यांनो! ऊसावर कीड व बुरशीजन्य रोगांचा वाढतोय प्रादुर्भाव, रोगाच्या नियंत्रणासाठी कृषि तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला नक्की वाचा
- भोजापूर चारीच्या पाण्यासाठी दोन गावाने दिला रास्ता रोकोचा इशारा, ४० वर्षापासून पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना न्याय देण्याची मागणी