मुंबई : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात माल घालून बीजेपीच्या सर्व नेत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
यामध्ये सर्वात आधी या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस, सूरजीतसिंह ठाकूर यांची नावंही चर्चेत होती.मात्र या तीघांना धक्का देऊन प्रवीण दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
प्रवीण दरेकर हे मनसेतून भाजपमध्ये आलेले नेते आहेत. मनसेमध्ये असताना दरेकर हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. २०१४ मध्ये त्यांचा मनसेत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांना विधानपरिषदेवर आमदार केले होते.