अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- लग्न झाल्यानंतर किती वर्ष मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहतो? एकदा नियम पहाच….
- 2025 च्या दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्त्याची (DA) नवीन आकडेवरी समोर ! किती वाढणार डीए ?
- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, संपूर्ण राज्यात एकाच वेळी परीक्षा होणार, कस आहे वेळापत्रक ?
- बजाज, ओला, टिव्हीएसच मार्केट खायला दाखल झाली सर्वात स्वस्त ईव्ही स्कूटर; किंमत अगदी किरकोळ
- भारतातील सर्वात उंच इमारत कोणती माहिती आहे का? प्लॅटची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे