चर्चेसाठी भाजपाचे दरवाजे २४ तास खुले – चंद्रकांत पाटील

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : शिवसेनेसोबत चर्चेसाठी भाजपाचे दरवाजे २४ तास उघडे आहेत. राज्यात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार येणार आहे. 

संपूर्ण भाजपा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी यावेळी उपस्थित होते. 

राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच अवकाळी पावसाने झालेले नुकसान यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, राज्यातील जनतेने महायुतीलाच जनादेश दिला आहे. 

या जनादेशाचा आदर करून आम्ही लवकरच सरकार स्थापन करणार आहोत, शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी भाजपाचे दरवाजे २४ तास खुले असल्याचेही ते म्हणाले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment