मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरेंचा अत्यंत मोठा निर्णय

Ahmednagarlive24
Published:
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता  राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 
याचसोबत ते एक नवा इतिहास घडवण्याच्या अवघ्या काही तास दूर आहेत. कारण आजवर ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे पद घेतलं नव्हतं.
मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडून एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या पदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’चं संपादक पद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सामनाच्या संपादकपदी उद्धव ठाकरे हे होते. तर संजय राऊत हे कार्यकारी संपादक होते.
मात्र, आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याने त्यांनी संपादक पद सोडलं आहे. त्यामुळे आजच्या क्रेडीट लाइनमधून उद्धव ठाकरे यांचं नाव काढण्यात आलं असून त्याजागी फक्त कार्यकारी संपादक संजय राऊत यांचंच नाव ठेवण्यात आलं आहे.
एकाच वेळी दोन महत्त्वाच्या पदांवर राहू नये यासाठीच उद्धव ठाकरे यांनी सामनाचं संपादक पद सोडलं आहे. त्यामुळे आता सामनाची संपूर्ण जबाबदारी ही फक्त संजय राऊत यांच्याकडेच असणार आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment