मुंबई : चालत्या लोकलमध्ये भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची घटना दहिसर-मीरा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान घडली.
लोकलचा वेग कमी असल्याने पत्नी व तिच्या पोटात असलेले अर्भकाचे प्राण वाचले आहेत. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती सागर धोडी (२५) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बोरिवली, पूर्व परिसरात राहणारा सागर आणि त्याची दुसरी पत्नी राणी हे दोघे लोकलने बोरिवलीहून नालासोपारा येथे जात असताना त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. लोकलच्या दरवाजाशेजारी उभ्या असलेल्या राणीला रागाच्या भरात सागरने ट्रेनमधून बाहेर ढकलले.

सुदैवाने या वेळी ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे राणीचे प्राण बचावले. राणीच्या पायांना, उजव्या हाताला आणि डोळ्यांना मार लागला.
स्टेशन मास्तरने जीआरपीला याची माहिती दिल्यानंतर राणीला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पोटातील बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले.