मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्यावरून आणि मुख्यत: मुख्यमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात सध्या जबरदस्त ओढाताण सुरू आहे. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर अडून बसल्याने सत्तास्थापनेचे गणित काही जुळताना दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आपले एक ताजे छायाचित्र आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करून त्याखाली ‘लक्ष्य तक पहुँचनेसे पहले सफर में मजा आता है’ असा हिंदीतून मजकूर टाकला आहे. राऊत यांचे हे ट्विट म्हणजे भाजपाला अप्रत्यक्ष इशाराच आहे, असे मानले जाते.

राऊत यांनी या ट्विटमध्ये आपल्या फोलोअर्सना हिंदी भाषेतून ‘जय हिंद’ असे म्हणत अभिवादन केले आहे. वास्तविक शिवसेना नेते नेहमी ‘जय महाराष्ट्र’ असा नारा देतात. त्यामुळेही काहींच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपाबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींदरम्यान उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतच सध्या वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. रविवारीच त्यांनी १७० आमदारांच्या पाठिंब्यावर शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करेल, असा दावा केला होता.
दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सायंकाळी त्यांची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याशी बैठक होती. दुसरीकडे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रविवारी अकोला येथील सभेत सर्व काही सुरळीत होऊन लवकरच भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
- लाडक्या बहिणींसाठी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी घोषणा! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार दोन महिन्यांचे पैसे
- ‘मराठी अस्मिता’ फक्त राजकीय शस्त्र ! मुंबईत मराठी माणसांचा टक्का सतत घसरतोय; 25 – 30 वर्षाच्या सत्तेचा फायदा कोणाला ?
- नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार ? समोर आली नवीन माहिती
- महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला रेकॉर्डतोड भाव !
- वाईट काळ संपला ! आता हवं ते मिळणार, 16 जानेवारी 2026 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश













