गुप्तांग कापून निर्दयी खून प्रकरणी ३ तृतीयपंथी गजाआड

Ahmednagarlive24
Published:

पंढरपूर : पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा डोक्यात चेहऱ्यावर, पोटावर दगड आणि काचेच्या फुटलेल्या बाटलीने मारून हा निर्दयीपणे खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.

तसेच मयताचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत असल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. ही धक्कादायक घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली होती.

खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी या भागात अखेर यश आले आहे.  याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन तृतीयपंथीयांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अक्षय उर्फ आकाश उर्फ डर्जा रमेश जाधव (वय वर्ष २३ रा. बेलीचा महादेव मंदिर जवळ, संभाजी चौक) दिंगबर उर्फ डिग्या काशिनाथ महानवर (वय वर्ष २१,या सेंट्रल नाका पंढरपुर) नागेश उर्फ मोनिका विठ्ठल शिंदे(वय वर्ष २३ रा कुंभार घाट, सहकार चौक) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपी आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment