स्वत:च्याच गळ्यावर धारदार ब्लेडने वार करून तरुणाची आत्महत्या

नगर – स्वत: च्या गळ्यावर धारदार ब्लेडने गळा कापून  तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पारनेर तालुक्यातील पळवे बु. हॉटेल जयराम येथे घडली.  

हॉटेल जयराम येथील हॉटेलच्या खोलीत खोलीचा दरवाजा आतून बंद करुन देवचंद सुमेर रमोला वय ३० वर्ष, रा. उत्तरकाशी उत्तराखंड, हल्ली रा. हॉटेल जयराम या तरुणाने स्वत: च्या गळ्यावर धारदार ब्लेडने गळा कापून  कापून घेवून आत्महत्या केली. 

या प्रकरणी पोपट बबन करपे, रा. पळसे बु. यांनी सुपा पोलिसांत खबर दिल्यावरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यू नं. ३० नोंदविला असून घटनेची खबर मिळताच पोनि भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह हॉटेल जयराम येथे भेट दिली. 

तेथे हॉटेलच्या खोलीत ब्लेडने गळा कापलेल्या स्थितीत मृतावस्थेत देवचंद रमोला या तरुणाचा मृतदेह आढळून आला. 

स.फौ पठाण हे पुढील तपास करीत आहेत. देवचंद या तरुणाने नेमका कोणत्या कारणाने हा प्रकार केला? किंवा आणखी काय ? याचा तपास सुरू आहे. या घटनेने सुपा परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment