पारनेर : खा. सुजय विखेंच्या ताफ्यातील पोलिसांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना पिंपळगाव-अळकुटी रोडवरील गारखिंडी घाटात बुधवारी दुपारी घडली.
या अपघातात चालक पो. कॉ. पोपट मोकाते यांचा पाय मोडला असून त्यांना पुढील उपचारासाठी विळद येथील विखे पाटील रूग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.
तर या अपघातात सपोनि. बालाजी पदमने यांच्यासह इतर ३ पोलिस व होमगार्ड कर्मचार्यांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
खा. सुजय विखे हे बुधवारी सकाळी ११ वाजता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणीसाठी पारनेर दौर्यावर आले होते. भाळवणी, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या व मांडओहोळचा धरण दौरा आटोपून पिंपळगाव रोठा जवळ असणार्या गारखिंडी घाटात या वाहनाचा रॉड तुटल्याने गाडी १५० ते २०० फुट खोल दरीत कोसळली.