पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल !

Published on -

अहमदनगर :- ‘परशुराम सेवा संघ लवकरच व्यापक रूप घेणार असल्याने भविष्यकाळ संघासाठी चांगला राहणार आहे.

त्यामुळे यापुढे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार असेल आणि पुढचा मुख्यमंत्री परशुराम सेवा संघाचा असेल,’ असे प्रतिपादन परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे यांनी येथे केले.

परशुराम सेवा संघाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक नगरच्या एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे यांच्या पुढाकाराने नुकतीच झाली. या वेळी मुळे यांनी मार्गदर्शन केले.

उपाध्यक्ष मोरेश्वर सदावते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उल्हास अकोलकर, प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे, उपाध्यक्ष उपेंद्र जपे आदी उपस्थित होते. ‘परशुराम सेवा संघ हा कोणाच्या विरोधात काम करीत नसून ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी काम करतो,’ असेही मुळेंनी स्पष्ट केले.

या वेळी ‘ब्रह्मप्रस्थान छळाकडून बळाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. परशुराम सेवा संघाचे सभासद नोंदणी अभियान देशभरात राबवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe