माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा – सुजय विखे

Published on -

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

तसेच, शिवसेनेने माझ्या कार्यक्षेत्रात जे उत्कृष्ट काम केलं, उद्धव साहेबांचे आभार मानायला आलो होतो. माझ्या विजयात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना दिली.

याचबरोबर, जे संकटांच्या काळात पाठीशी उभे राहिले, त्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी भेटत आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात हालचालींना वेग येईल. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच येईल. मुख्यमंत्र्यांनी जसा माझा सन्मान केला, तसा माझ्या वडिलांचाही सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे. असेही सुजय विखे यांनी म्हंटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe