अहमदनगर :- लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याच्या विरोधात समाज माध्यमांमध्ये ‘अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढुन प्रसिध्द केल्याचे कारणाने गुड्डु खताळ अथवा मुळ प्रसारक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार निवडणुक निर्णय आधिका-यांकडे करण्यात आली आहे.
सदरचे व्यंगचित्र प्रसारीत करणा-याला डॉ.सुजय विखे पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदवी व ते न्युरोसर्जन असल्याबाबत माहीती असतानाही, त्यांनी जनसामान्यांसमोर व मतदारासंमोर खोटी प्रतिमा उभी केली आहे.

सुजय विखे पाटील यांची मुद्दाहुन बदनामी करण्याच्या विशुध्द हेतूने डॉ.सुजय विखे पाटील हे बोगस व्यक्तिमत्व आहे असे दाखविण्याचा व मतदारांच्या मनात व्देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मतदारांची मते कलुशित होवुन त्याचा विपरीत परिणाम मतदानावर व निवडणुक निकालावर व्हावा अशा वाईट हेतून सदरचे व्यंगचित्र प्रसारीत करण्यात आले आहे.
कोणताही कायदेशिर हक्क व आधिकार नसताना त्यांनी निवडणुक काळात अशा प्रकारचे बदनामीकारक व्यंगचित्र प्रसारीत करुन उमेदवाराची मानहानी केल्याच्या कारणाने त्यांच्या विरोधात निवडणुक विषयक कायदे व भारतीय दंडविधान आचार संहितेतील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
या संदर्भात उमेदवारांचे प्रतिनिधी डॉ.अभिजीत दिवटे यांनी निवडणुक निर्णय आधिका-यांकडे रितसर लेखी तक्रार दाखल केली असुन, यामध्ये म्हंटले आहे की, डॉ.सुजय विखे पाटील हे स्वत: न्युरो सर्जन आहेत.
या मतदार संघातुन भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणुक लढवत आहेत. डॉ.सुजय विखे पाटील हे डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखाना, मुळा प्रवरा को ऑपरेटीव्ह सोसायटी या संस्थेचे चेअरमन आहेत.
डॉ.विखे पाटील फौंडेशन विळदघाट या शैक्षणिक संस्थेचे मुख्य कार्यकारी आधिकारी व विश्वस्त म्हणुन कार्यरत आहेत. समाज घटकांकरीता गेली अनेक वर्षे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक कार्य केले आहे त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे.
मात्र दि. 11 एप्रिल 2019 रोजी व्हॉट्सऍप नंबर 9975616161 यावरुन अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढुन प्रसिध्द केले आहे. मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ हा संजय दत्त यांच्या चित्रपटात मेडीकलची पदवी नसलेला बोगस डॉक्टर दाखविलेला आहे.
त्याचा आधार घेवून गुड्डु खताळ अथवा मुळ प्रसारक यांनी डॉ.सुजय विखे पाटील यांची प्रतिमा बोगस डॉक्टर म्हणुन दाखविली असल्याकडे निवडणुक निर्णय आधिका-यांचे लक्ष वेधले आहे.
- व्हॅटिकन नव्हे, ‘हा’ आहे जगातील सर्वात छोटा देश; जिथं राजा आणि राणी चालवतात सरकार
- रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांनो सावधान, संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
- मोबाईलचा अतिवापर ठरू शकतो घातक, WHO ने दिला धोक्याचा इशारा; आत्ताच व्हा सावध!
- जगातील 50 टक्के श्रीमंत लोक राहतात ‘या’ देशात; भारताचा नंबर कितवा?, पाहा संपूर्ण यादी
- 200MP कॅमेरा, Snapdragon 8 Gen 3, Samsung च्या फोनवर मिळतेय 43,880 रुपयांची घसघशीत सूट!