५ लाख रुपये माहेरुन घे, तरच तुला नांदवतो, असे म्हणत मारहाण…

Published on -

राहुरी  – राहुरी येथील सातनपीरबाबा रोड परिसरात राहणारी विवाहित तरुणी तेरेसा कन्हैय्या वाघमारे ही भैरवनाथ मंदिर परिसर कोंढवा खुर्द, पुणे येथे नांदत होती. 

नांदत असताना नवरा व सासरच्या लोकांनी ११/ ५/ २०१८ ते १८/ ६/ २०१८ दरम्यान ५ लाख रुपये माहेरुन घे, तरच तुला नांदवतो, असे म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करुन शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिले.

 काल याप्रकरणी तेरेसा कन्हैय्या वाघमारे यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा कन्हैय्या बंडू वाघमारे, स्टेला अनिल शर्मा दोघे रा. कोंढवा पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना खरात हे पढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News