राहुरी :- कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने आलेल्या नैराश्यातून गडदे आखाडा येथील अविवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली.
भारत बारकू गडदे (२४) याने दोन वर्षांपूर्वी फायनन्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. भारतने दोन सहामाही हप्ते व्याजासह भरले होते. मात्र, नंतर हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेला.

ट्रॅक्टर माघारी आणण्यासाठी भारतने उसनवार करून पैसे जमवले. मात्र, या ट्रॅक्टरचा लिलाव झाल्याने भारतचे प्रयत्न निष्फळ ठरले. नैराश्य आलेल्या भारतने घरातील आढ्याला गळफास घेत या जगाचा निरोप घेतला.
भारतचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. कर्जाचा हप्ता थकल्याने ट्रॅक्टरचा झाला लिलाव काम न मिळाल्याने अडचणींत पडली भर भारत गडदे हा अल्पभूधारक शेतकरी होता. जोडधंद्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्याने ट्रॅक्टर घेतला होता.
मात्र, गळीत हंगामात ऊसतोडणी कामासाठी जुगाड मिळाले नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने हा आघात भारतला सहन झाला नाही.
- Ahilyanagar Politics : सुप्यातील उद्योजकांना पालकमंत्र्यांचा जाच ! खा. नीलेश लंके यांची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे Railway संदर्भात खा. लंकेंची बैठक ! निंबळक, विळद येथील…
- CNG vs Electric Car : कोणती कार खरेदी करावी ? – कोणत्या कारचा खर्च कमी आणि मायलेज जास्त
- Volkswagen कार्स स्वस्तात ! मार्च महिन्यात Virtus, Taigun आणि Tiguan चार लाखांनी स्वस्त
- Maruti Suzuki Celerio वर 80 हजारांची ऑफर ! 6 एअरबॅग्स आणि 35Km+ मायलेजसह बेस्ट डील