स्कुटर खड्ड्यात आदळून एकाचा मृत्यू

Published on -

संगमनेर – संगमनेर तालुक्यात साकूर गावच्याजवळ बिरेवाडी फाट्याजवळ कोठे मकापूर रस्त्यावर स्कूटर दुचाकी नं. एमएच १७ सीइ ६६५८ हिच्यावरील, 

चालक रमेश मच्छिंद्र बोरुडे, रा. कोल्हार, ता. राहाता याने स्कूटरवर पाठीमागे मनाजी काशिनाथ नान्नोर, वय ७४, रा. गंगापूर, ता. राहुरी यांना बसवून साकूर ते करणपूर अशी स्कूटर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालविली. 

दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात स्कूटर आपटून पाठीमागे बसलेले मनाजी नान्नोर हे खाली पडून दगडावर डोके आपटून गंभीर जखमी होवून ठार झाले. 

काल याप्रकरणी दत्तात्रय चांगदेव चिंधे, रा. कुरणपूर, ता. श्रीरामपूर यांनी वरीलप्रमाणे घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी स्कूटर चालक रमेश मच्छिंद्र बोरुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हे.कॉ टकले हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe