अहमदनगर :- प्रामाणिक पणे कार्य केले तर जनतेची साथ भेटतेच, नगरचा सर्वागीण विकास हेच स्वप्न बाळगून या पुढे कार्य करणार असून जितोच्या ट्रेड फेअरने नगरच्या उद्योजकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून राज्यात नावलोकिक प्राप्त केले.
प्रथमच अतिशय भव्य असा ट्रेडफेअर उत्तम नियोजनामुळे यशस्वी झाला असून जितो संघटनेच्या सहकार्याने नगर विकासाचे नवे धोरण राबविणार असल्याचे मत नवनिर्वाचित आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

जितो अहमदनगर शाखेतर्फे नवनिर्वाचित आ.संग्राम जगताप यांचा अध्यक्ष श्री.गौतम मुनोत व श्री.जवाहर मुथा यांच्या हस्ते आचार्य आनंदऋषी यांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आ.जगताप बोलत होते.यावेळी श्री.किशोर मुनोत, सचिव अमित मुथा,गौतम मुथा,
विजय गुगळे,तुषार कर्नावट,संजय गुगळे,महेश मुथियान,सुनीत मुनोत,प्रीतेश दुग्गड, सौरभ भंडारी,विनीत छाजेड,केतन मुनोत,आशिष मुनोत,प्रीतेश लोढा,दिनेश ओस्तवाल, अलोक मुनोत,रितेश पटवा,सागर गांधी,प्रशांत बोगावत,कमलेश मुनोत व जितोचे सर्व सदस्य उपस्थित होते.
जीतोचे अध्यक्ष श्री.गौतम मुनोत यांनी प्रास्ताविक केले, नगरकरांनी दाखविलेला विश्वास व पुन्हा दिलेली संधीचे सोने करण्याची धमक आ. संग्राम जगताप यांच्यात असून, उद्योजक व व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्याची त्यांना जाणीव आहे. आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे युवानेते आ.जगताप यांना जितोचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.
जितो ट्रेडफेअरच्या वेळेस पार्किग समस्या व इतर अडचणी सोडविण्यात आ. संग्राम जगताप यांची मोलाची साथ लाभली. असे हे युवा नेतृत्व नगरचा विकास निश्चित करतील असा जितोच्या सर्वाना विश्वास आहे असे जीतोचे सचिव अमित मुथा यांनी सांगितले व सर्वांचे आभारही मानले.
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही